Breaking News

बीड शहरात दिवाळीनिमित्त दोन दिवसाला पाणीपुरवठा करण्यात यावा : शिवसंग्रामचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदनबीड : हिंदू धर्मियांचा दिवाळी हा सर्वात मोठा सणोत्सव असतो. या सणानिमित्त बीड शहरात सध्याच्या ८ ते १२ दिवसांच्या कालावधीतील पाणीपुरवठा हा २ दिवसांसाठी करण्यात यावा अशी मागणी शहरातील गृहिणींकडून होत आहे. पाणी दोन दिवसाआड सोडल्यास शहरातील गृहिणींना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही. म्हणून नगरपरिषदेने २ दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने मुख्याधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

   

बीड शहरातील बुंदेलपुरा, नवी भाजी मंडई येथे ८ ते १० दिवसाला, तेलगाव नाका भागात तर १५ दिवसाला पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची प्रचंड मुबलकता असताना पाणीपुरवठा केला जात नसल्याने शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे. किमान दिवाळी तरी शहरातील नागरिकांची गोड व्हावी यासाठी पाणीपुरवठा २ दिवसांआड करण्यात यावा अशी मागणी शिवसंग्रामने केली आहे. 

हा पाणीपुरवठा २ दिवसाआड केला नाही तर नगरपरिषदेवर महिला रिकामे भांडे घेऊन धडकतील असा इशारा शिवसंग्रामकडून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी शिवसंग्राम शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, गणेश धोंडरे, शैलेश सुरवसे, हरीश शिंदे आदींसह शिवसंग्राम पदाधिकारी, कार्यकर्ते, बीडकर उपस्थित होते.   No comments