Breaking News

आत्मदहनात मयत झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आ विनायक मेटेंचा मंत्री जयंत पाटलांना फोनशिवसंग्रामच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा नातेवाईकांसह जिल्हा रुग्णालयात ठिय्या

पाटबंधारे कार्यकारी अभियंता, उपजिल्हाधिकारी, उपअधीक्षक भूमिअभिलेख यांच्यावर ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल  

शिवसंग्रामच्या आक्रमकतेमुळे मयत साळुंके यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे लेखी आश्वासन  

बीड  : गेल्या अनेक वर्षांपासून कार्यालयाचे खेटे मारूनही न्याय मिळत नसल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या कारभाराविरुद्ध संतापलेल्या ४९ वर्षीय अर्जुन कुंडलिक साळुंके यांनी परवा दि २४ नोव्हेंबर रोजी दुपारी लघु पाटबंधारे कार्यालयाच्या दारात पेट्रोल अंगावर घेऊन जाळून घेतले होते. ९० टक्के भाजल्याने त्याचण्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. काल रात्री त्यांचे निधन झाले. या घटनेबाबत संपूर्ण जिल्ह्यासह राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मयत अर्जुन साळुंके यांच्या आईनेही याच विषयानुषंगाने भूसंपादनाबाबत मंत्रालयात १ वर्षांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताच शिवसंग्राम पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.

    

मयत साळुंके यांचा मृतदेह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व साळुंके यांच्या मागणीला न्याय मिळेपर्यंत स्वीकारला जाणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. यावेळी शिवसंग्रामच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून न्याय मिळेपर्यंत तेथेच थांबण्याची भूमिका घेतली. आ विनायक मेटे यांनी मंत्री जयंत पाटील यांना याबाबतची माहिती देत संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळायला हवा व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी फोन करून केली. लोकांमधील प्रशासन व सरकारविरुद्धच्या संतापाबाबत मंत्री जयंत पाटलांनी तात्काळ दखल घेत कारवाईचे सूत्रे हलवली.

  पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता, उपजिल्हाधिकारी तसेच उपअधीक्षक भूमिअभिलेख यांच्याविरुद्ध भांदवी कलम ३०६ व ३४ नुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. यावेळी पाटबंधारे विभागाकडून प्रश्न सोडवण्यासंदर्भात लेखी आश्वासन देखील घेण्यात आले. जोपर्यंत निगरगट्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत शिवसंग्राम जिल्हा रुग्णालयाला सोडणार नसल्याची भूमिका शिवसंग्रामच्या शेकडो कार्यकर्त्यांसह तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे व ज्ञानेश्वर कोकाटे यांनी घेतली होती. आ विनायक मेटे यांनी फोनद्वारे मयत शेतकऱ्याच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. शिवसंग्राम मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहणार असल्याचा आधारही त्यांनी दिला.

      

पोलिसांकडून परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा फौजफाटा तेथे तैनात करण्यात आला होता. मात्र नातेवाईक व शिवसंग्राम कार्यकर्त्यांनी माघार न घेता मागण्या मान्यच करून घेतल्या. यावेळी शिवसंग्राम जेष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, सरचिटणीस अनिल घुमरे, तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, माजी सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, ऍड राहुल मस्के, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष अक्षय माने, युवक तालुकाध्यक्ष गणेश साबळे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, युवक सरचिटणीस विनोद हातागळे, संदीप नवले, विजय सुपेकर, हरीश शिंदे आदींसह मयत शेतकऱ्याचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रशासन व सरकारसाठी लाजिरवाणी बाब असताना काही जणांकडून चक्क दोषी प्रशासनाची बाजू घेण्याचा प्रयत्न 


मयत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी ही बाब लक्षात आणून देताच शिवसंग्रामने हा कुटील डाव उधळला !


न्याय मिळत नसल्याने हतबल होऊन आत्मदहन करत पेटवून घेण्याची वेळ शेतकऱ्यावर येणे हि सरकार आणि प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे. मात्र अशा परिस्थितीत काही लोकप्रतिनिधींकडून प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे दोषी प्रशासनाची बाजू घेण्याचा प्रयत्न सुरु होता. याबाबत मयत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी हि बाब शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिली. चक्क इतकी गंभीर घटना घडूनही कुणीही अधिकारी फिरकला नसल्याने कुणीतरी पाठराखण करत आहे हि बाब नातेवाईक व शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना लक्षात आली. जोपर्यंत पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांकडून मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना न्याय देण्यासंदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. यावेळी काही जणांकडून प्रत्यक्षपणे तेथे उपस्थित राहून न्याय देण्याऐवजी दोषी अधिकाऱ्यांची पाठराखण करण्याचा केवीलवाणा प्रयत्न झाल्याचे पाहण्यास मिळाले. याबाबत संपूर्ण तालुक्यात संबंधित लोकप्रतिनिधीबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 

प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष 


अतिशय गंभीर घटना घडलेली असताना देखील प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी केलेलं दुर्लक्ष जनतेच्या प्रचंड जिव्हारी लागेलेलं आहे. शेतकऱ्याला आपल्या न्याय हक्कासाठी जीव द्यावा लागला तरीही निगरगट्ट प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधी तिकडे फिरकले देखील नाही. गुन्हा व लेखी आश्वासन घेऊन मयताचा अंत्यविधी पाली येथे केला गेला. 

 No comments