Breaking News

आ. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ सहविचार सभेस उपस्थित रहा - ॲड. बी. आर. डक

बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता वैष्णवी मंगल कार्यालय येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सहविचार सभेत पदवीधरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ॲड. बी. आर. डक यांनी केले आहे.

      

राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.याचा विचारसभेच्या अध्यक्ष स्थानी आमदार प्रकाशदादा सोळंके हे राहणार आहेत तर माजी आमदार मोहनराव सोळंके ,माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, अशोकराव डक,बाबुराव पोटभरे, दयानंद स्वामी, मिलिंद आव्हाड, सतीश सोळंके, खुर्शिद नाईक नासेर पठाण, रमेश सोळंके, आप्पासाहेब जाधव ,हरिभाऊ सोळंके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ वैष्णवी मंगल कार्यालयात आयोजित सहविचार सभेस पदवीधर मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ॲड.बी.आर.डक प्रा.निळकंठ साबळे डॉ.सुनील गरड यांनी केललआहे.


No comments