Breaking News

चैत्यभूमीवर मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या भीम सैनिकांना व अनुयायांना परवानगी द्या-ॲड.सदानंद वाघमारे

 


बीड : मंदिर उघडी करणाऱ्या आघाडी सरकारने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना मानवंदना देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी जनप्रहार सामाजिक संघटनेचे सचिव तथा विधी सल्लागार ॲड. सदानंद वाघमारे यांनी केली आहे. 

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर देश-विदेशातून अनेक नागरिक मानवंदना देण्यासाठी येतात त्यांच्या आरोग्यविषयक काळजी घेऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी जेणे करून त्यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी आपल्या मायभूमीत घेऊन जाण्यासाठी प्रेरणा मिळेल.देश-विदेशातून राज्यातून अनेक अनुयायी शिस्तबद्ध पद्धतीने तेथे येऊन महामानवाला अभिवादन करतात स्वच्छतेचे सर्व नियम पाळून ते आपल्या महापुरुषाचे स्मरण करतात कोरोना महा मारी आजाराचे सावट सध्या राज्यभरात देशांमध्ये पसरले असून येणाऱ्या अनुयायांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत चाचणी करून त्यांना मास्क वाटप करण्याचे आव्हान यावेळी जनप्रहार सामाजिक संघटनेचे सचिव तथा विधी सल्लागार ॲड. सदानंद वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.


No comments