Breaking News

पक्ष्यांच्या अस्तित्वावरच मानवाचे अस्तित्व अवलंबून -अमोल सातपुते

पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने सिंदफणा जलाशयावर पक्षीनिरीक्षण; चार तासात ५० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद

 शिरूर कासार  : पक्षी सप्ताह चे औचित्य साधून सामाजिक वन विभाग व वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन  अँड सॅक्टयुअरी असोसिएशन व सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील पक्षितीर्थ म्हणून ओळख असलेले सिंदफणा जलाशयावर व नायगाव मयूर अभयारण्यात पक्षी निरीक्षण करण्यात आले. यावेळी विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते,वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी  प्रशांत आवळे यांनी स्वतः चार तास भ्रमंती करून पक्षी निरीक्षण केले.ह्या चार तासाच्या निसर्ग भ्रमंतीत त्यांनी पन्नास प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद केली.

       

 यावेळी अमोल सातपुते यांनी मार्गदर्शनही केले." ते म्हणाले पक्षांच्या अस्तित्वावरच मानवाचे अस्तित्व अवलंबून असते. मानवाचे अस्तित्व हे पर्यावरणातील विविध घटकावर टिकून आहे. हे घटक टिकवून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य वन्यजीव,पक्षी करत असतात. यासाठी निसर्ग परिसंस्थेतील प्रत्येक घटकाचे संरक्षण आणि संवर्धन हे मानवाने करणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले.

        

 या वर्षीपासून राज्य सरकारने ५ नोव्हेंबर हा दिवस अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा ९० वा वाढदिवस तर १२ नोव्हेंबर हा पक्षीतज्ञ सलीम अली यांचा जन्मदिवस. ५ ते १२ नोव्हेंबर हा कालावधी पक्षी सप्ताह म्हणून प्रारंभ केलेला आहे.

             

पक्षी सप्ताहाचे औचित्य साधून स्वतः सामाजिक वन विभागाचे विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, सर्पराज्ञी चे संचालक सिद्धार्थ सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी  प्रशांत आवळे यांनी सकाळी सात ते अकरा या चार तासाच्या निसर्ग भ्रमंतीत सिंदफणा जलाशयावर पन्नास प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद केली. यामध्ये वारकरी, हळदीकुंकू,पानकावळा, पान कोंबडी, रंगीत करकोचा,करकोचा, वेडा राघू,राखी बगळा, बगळा, खंड्या,चमचा,टिटवी,सेकाट्या, शराटी आधी पक्ष्यांची नोंद केली.


 सिंदफणा जलाशयावर पक्षी निरीक्षण करतांना विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी  प्रशांत आवळे


No comments