Breaking News

पदवीधरांच्या प्रश्‍नांसाठी सातत्याने आवाज उठविणार्या सतिष चव्हाण यांना पहिली पसंती द्या - जयसिंगराव गायकवाड पाटील

गेवराई :   शाहु - फुले - आंबेडकरी चळवळीचा वारसा घेवून विद्यार्थी आणि पदवीधरांच्या प्रश्‍नांसाठी सातत्याने आवाज उठविणार्या सतिष चव्हाण यांना पुन्हा एकदा पहिल्या पसंतीचे मत देवून विधान परिषदेत पाठवा असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी केले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महाविकास आघाडीचे उमेदवार सतिष चव्हाण यांना सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांचा विजय आता कोणीही रोखू शकत नाही तर आजच्या या पदवीधरांच्या प्रतिसादावरून सतिष चव्हाण यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व  महाविकास आघाडी औरंगाबाद पदवीधर संघाचे अधिकृत उमेदवार सतिष चव्हाण यांच्या प्रचारार्थ गेवराई येथे आयोजित केलेल्या सहविचार सभेत  ते बोलत होते.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सतिष चव्हाण यांच्या प्रचारार्थ गेवराई येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित हे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, जालिंदर पिसाळ, अ‍ॅड.एच.एस.पाटील, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, दत्ताभाऊ दाभाडे, दिपक आतकरे, माजी सभापती कुमार ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील म्हणाले की, पदवीधरांच्या प्रश्‍नांसाठी सतिष चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात सातत्याने सभागृहात आवाज उठविला. विद्यार्थी, शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्‍नांवर आवाज उठविणारा एक लढवय्या नेता म्हणून सतिष चव्हाणांकडे पाहिले जाते. सर्वांना सोबत घेवून शाहु-फुले-आंबेडकरी चळवळीचा वारसा घेवून त्यांच्या विचारावर सतिष चव्हाण यांनी आजपर्यंत वाटचाल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराच्या दिंडीची सतिष चव्हाण एक वारकरी आहेत. या उमेदवाराला आपण पहिल्या पसंतीचे मत देवून विजयी करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आपल्या भाषणात बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, युवकांच्या प्रश्‍नांसाठी सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सतिष चव्हाण यांनी आपल्या आमदारकीच्या काळात केला. पदवीधरांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. यापुढील काळातही पदवीधर युवक, विद्यार्थी, शिक्षकांच्या हितासाठी सतिष चव्हाण यांना पहिली पसंती देवून विजयी करा असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री बदामराव पंडित म्हणाले की, गेवराई तालुक्यातून सतिष चव्हाण यांना मागच्या पदवीधर निवडणुकीतही भरघोस मतदान झाले तसेच मतदान या निवडणुकीतही त्यांना होणार आहे. आपण सर्वांनी मिळून त्यांची पसंती घराघरापर्यंत पोहोचवून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असेही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष महाराज नागरे यांनी केले, सुत्रसंचलन प्रा.राजेंद्र बरकसे यांनी  तर आभार प्रा.गणेश सुर्यवंशी यांनी मानले. यावेळी किशोर कांडेकर, महादेव औटी, राजु गायकवाड, नगरसेवक शाम येवले, नवीद मशायक, जयसिंग माने, आनंद सुतार, दत्ता पिसाळ, संदीप मडके, कैलास पवार, प्राचार्या डॉ.रजनी शिखरे, डॉ.पांगरीकर, प्रा.जगताप यांच्यासह पदवीधर मतदार उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सर्व नियमांचे पालन करून तसेच सामाजिक अंतर ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला.

No comments