Breaking News

कुणाल कांबळेचे दुःखद निधन


पंखाचे बळ गळून पडले आणि आयुष्याच्या दोरीने फास आवळला........ 


बीड : माळीवेस येथील बुद्ध विहारानजीक वास्तव्यास असलेला कुणाल कांबळे याचं दि. ३० ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झालं. त्याच्या निधनामुळे परिसरात शिकाकुल वातावरण पसरले आहे. 


संस्कार विद्यालयातुन इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत कुणालने ८४ टक्के गुण मिळवून प्राविण्यासह उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याचं मन बीड मध्ये रमल नाही. त्याने औरंगाबाद येथील शासकीय तंत्र निकेतन मधून मॅकेनिकल इंजिनिरिंगचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे त्याठिकाणी त्याचा मोठामित्र परिवार होता. परंतु गावाकडं येण्याची त्याची इच्छा असल्याने तो, बीड मध्ये आला. त्यानंतर त्यानं के. के. इंटर प्राईस, के. के इंडियन नावाने स्वतः चा फर्म स्थापून व्यवसाय उभारला. दरम्यान कोरोनाच्या संकटामुळे वडील डॉ. कृष्णकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनातून व केएसके मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. अरुण भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सॅनिटायजर, मास्क, हॅण्डवाश ही काळाची गरज ओळखून तुटपुंज्या भांडवलावर स्वतःच्या जागेत व्यवसाय उभारुन त्यात त्याने उतुंग भरारी घेतली. पण नियतीच्या मनात काही वेगळंच दडलं होत. 


प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कुणालने उंच -उंच भरारी घेतली. पण त्याला आर्थिक व्यवहार कळलाच नाही. जवळचे भांडवल आणि वडिलांनी केलेली आर्थिक मदत संपली. मग मित्र मंडळींच्या सहकार्याने व्यवसाय करण्याचा कुणालने प्रयत्न केला. पण तिथंच नियतीनं घात केला. आयुष्याच्या दोरीने असा काही फास आवळला की, कुणालने आपलं जीवन संपविले. 

"मंजिले उन्हीको मिलती है, जिनके सपनो में जान हो, सिर्फ पंख होनेसे कुछ नहीं होता। हौसलेसे उडान होती है । 

या उक्तीप्रमाणे पंखाचे बळ गळून पडले आणि आयुष्याच्या दोरीने फास आवळला........  


No comments