Breaking News

शिक्षक आ. विक्रम काळेंच्या निष्क्रीयतेमुळे अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर बांधवांची दिवाळी अंधारात - सुरेश पाटोळे

 बीड : राज्यातील शिक्षण आमदार जसे निष्क्रिय आहेत तसेच मराठवाडा विभागाचे शिक्षक आ. विक्रम काळे यांचा निष्क्रीयपणा राज्यमध्ये उठून दिसतो. त्यामुळे गेल्या २० वर्षापासून वेठबिगारी काम करणारे विनाअनुदानित शाळेतील कर्मचारी यांना यावर्षी तरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून २०% अनुदान दिवाळीपूर्वी मिळेल आणि त्यांची दिवाळी गोड होईल असे वाटत होते. मात्र पुन्हा एकदा शिक्षक आ. विक्रम काळे यांच्या निष्क्रीयतेमुळे यावर्षीही विनाअनुदानित शिक्षकांची दिवाळी गोड होत नाही असे दिसते. 

राज्यातील सत्तर हजार विनाअनुदानित शिक्षकांची पिढी बरबाद झाली आहे शिक्षकांचे मतदान घेऊन महिनाकाठी शिक्षक आमदार लाखों रुपयांचे मानधन घेतात पुन्हा तोऱ्यामध्ये मिरवतात. त्यांच्या निष्क्रीयतेमुळे ७० हजार शिक्षक व शिक्षकेत्तर वेठबिगार झाले त्यांच्या पिढ्याही बरबाद झाल्या अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर हे अनुदान न घेताच सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. राज सरकारला व शिक्षक आमदारसह पदवीधर आमदाराला याचे सोयरसुतक नाही वाटत नाही. त्यामुळे आ. विक्रम काळे यांनी तात्काळ याप्रश्नी लक्ष घालावे. विनाअनुदानित शिक्षक कायमचा प्रश्न मिटवून प्रचलीत नियमानुसार अनुदान दयावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी केली आहे.


No comments