Breaking News

आ.सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा --कल्याण आखाडे


आ.सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ सावता परिषदेच्या बैठकीत आखाडे यांचे आवाहन 

बीड :  पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी मराठवाडाभरातील तमाम पदाधिकाऱ्यांनी जोमाने प्रचाराला लागावे असे अवाहन सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या सावता परिषदेच्या मराठवाडा विभागीय कार्यकारणी बैठकीप्रसंगी बोलताना केले.

        यावेळी बोलताना पुढे ते असे म्हणाले की, आ.सतीश चव्हाण हे प्रचंड मताधिक्याने तिसऱ्यांदा विजयी होऊन हँट्रिक करणार आहेत.ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ असून त्यांच्या मताधिक्यामध्ये आणखी भर घालण्यासाठी मराठवाड्यातील सर्व सावता सैनिकांनी प्रचार कार्यात सक्रिय भागीदारी करावी असे सांगून माळी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हाच सक्षम पर्याय असल्याचा विश्वास व्यक्त केला.          यावेळी मंचावर प्रदेशउपाध्यक्ष अभिमन्यु उबाळे व गोपाळ बुरबुरे, प्रदेश प्रवक्ते प्रा.डॉ.राजीव काळे, प्रदेश संघटक भास्कर गाढवे, प्रदेश सचिव बापूराव शिंदे, प्रदेश संपर्कप्रमुख शिवाजी येवारे, विभागीयअध्यक्ष शिवानंद झोरे, महिला आघाडीच्या प्रतिनिधी शारदा कोथिंबीरे व गेवराई मार्केट कमिटीचे सभापती जगन पाटील काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीसाठी मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हाकार्याध्यक्ष, महिला व युवा आघाडी जिल्हाध्यक्ष तसेच निमंत्रित कार्यकर्ते सहभागी झाले होते. बीड जिल्हाध्यक्ष किशोर राऊत यांनी उपस्थित सर्व मान्यवर व प्रतिनिधींचे स्वागत केले. सूत्रसंचालन बीड जिल्हा महासचिव दिगंबर राऊत यांनी तर आभार प्रदर्शन सुनीता गोबाडे यांनी केले.


No comments