Breaking News

चिंचोली माळीच्या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई

 

चौकशी पथकाला माहिती दडविल्याचाठेवण्यात आला ठपका, जिल्हा परिषदेच्या सामान्य विभागाने बजावली नोटीस

गौतम बचुटे । केज 

चौकशी पथकाला अभिलेखे व व इतर कागदपत्रे उपलब्ध न करून दिल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने त्यांना निलंबनाची नोटीस बजावली आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील ग्रामसेवक सोनवणे यांनी ग्रामपंचायत संदर्भात तक्रारीची चौकशी करण्यासाठी आलेल्या चौकशी पथकातील विस्ताराधिकारी व शाखा अभियंता यांना कामा संदर्भातील विविध अभिलेखे आणि कागदपत्रांची माहिती न दिल्यामुळे तसेच अभिलेखे ग्रामपंचायत कार्यालयात न ठेवल्यामुळे यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा ( वर्तणुक ) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केल. त्यामुळे संबंधित ग्रामसेवक सोनवणे विरुध्द महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९६४ मधील नियम ३ ( १ ) नुसार श्री सोनवणे एल. जी. ग्रामसेवक, पंचायत समिती, केज याना निलंबीत करण्यात आले आहे.

विस्तार अधिकारी ( पं ) व शाखा अभियंता , पंचायत समिती , बीड यांचे दि. ८ / १० / २०२० चे चौकशी अहवाला नुसार सोनवणे एल. जी. ग्रामसेवक, ग्रामपंचायत चिंचोलीमाळी ता. केज येथे कार्यरत असतांना तक्रारी नुसार चौकशी पथकाने चौकशी केली असता सदर बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. 

जनसुविधा अंतर्गत मार्च २०२० मध्ये मुस्लीम समाजासाठी मंजुर काम हे अंदज पत्रका प्रमाणे झालेले असून अंदाज पत्रकामध्ये प्लास्टर करणे या कामाची तरतुद नाही. घनदाट वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत १४ वा वित्त आयोगातून तार कंपाउंडचे काम केलेले असुन सदर कामाचे अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, मोजमाप पुस्तिका, साहित्य खरेदी प्रमाणके, सदर काम मंजुर आराखडयात आहे का नाही ? अंदाजपत्रका प्रमाणे निश्चित केलेल्या ठिकाणी काम झाले का नाही? साहित्य खरेदी १ लाखा पेक्षा जास्त रक्कमेची असल्यास ई-निवीदा प्रणालीद्वारे खरेदी केले किंवा नाही. अभिलेखे उपलब्ध करुन न दिल्यामुळे खातरजमा करता आली नाही. कामाचे अभिलेखे ग्रामपंचायत मध्ये ठेवणे आवश्यक असतांना १४ वा वित्त आयोगाचे कामाची तांत्रिक मान्यता घेतलेले कामाचे अंदाजपत्रके, मोजमाप पुस्तिका, कामाची प्रशासकीय मान्यता, साहित्य खरेदी, अधिकृत विक्रेता यांचेकडून खरेदी केल्याची प्रमाणके ताबा पावती, नमुना नंबर १५, १६ साहित्याची नोंद, काम पुर्ण झाल्याचे फोटो या सर्व बाबी दप्तरी ठेवली नसल्यामुळे पडताळणी करता आली नाही. 

महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ प्रमाणे ग्रामपंचायतीचे अभिलेखे ग्रामपंचायत मध्ये ठेवणे आवश्यक असतांना ठेवलेले नाहीत. कोविड -१९ च्या साथरोगा संदर्भात खरेदी केलेले मास्क व फवारणी औषधाचे प्रमाणके व वाटप रजिष्टर चौकशी दरम्यान पहावयास मिळाली नाही. तसेच संदर्भ क्र. ०२ अन्वेय कारणे दाखवा नोटीसी दिली असता नोटीसचा खुलासा सादर केला नाही. वरिष्ठाचे आदेशाचे पालन केले नाही. त्या अर्थ सोनवणे एल. जी. ग्रामसेवक, पंचायत समिती, केज यांनी चौकशी पथकास ग्रामपंचायतीचे अभिलेखे उपलब्ध करुन दिले नसल्याने संबंधितानी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केला आहे. 

त्यामुळे संबंधित ग्रामसेवक सोनवणे विरुध्द महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३ ( १ ) नुसार सोनवणे एल. जी. ग्रामसेवक, पंचायत समिती, केज याना याद्वारे निलंबीत करण्यात आले आहे.


No comments