Breaking News

साळेगाव सामूहिक बलात्कार- खून प्रकरण : खटला जलदगती न्यायालयात चालवून पिडीत कुटुंबाला न्याय द्या

अंकुर स्वयंसेवी संघटनेची महिला आयोगाकडे निवेदनाद्वारे मागणी 

गौतम बचुटे । केज

तालुक्यातील विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करून खून केल्या प्रकरणातील नराधम आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून पीडितेला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी अंकुर स्वयंसेवी संघटनेच्या वतीने अनिता कांबळे यांनी राज्य महिला योगाकडे केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि.३० रोजी केज तालुक्यातील साळेगाव येथे दस्तगिराचा माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेता जवळ सकाळी ८:३० ते ९:०० वा. दरम्यान शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या अश्विनी समाधान इंगळे वय वर्षे २४ या विवाहित महिलेवर पंकज भगवान जाधव व धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे या दोघांनी सामूहिक बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केला. तिचे प्रेत नग्नावधतेत फेकून दिले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध सामुहिक बलात्कार करून खून केल्याच्या आरोपखाली गु.र.नं. ४५३/२०२० भा.दं.वि. ३०२, ३७६ (ड) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झाला असून आरोपी अटक केले आहेत.

दरम्यान या प्रकरणी अंकुर स्वयंसेवी संघटना केजच्या अनिता कांबळे यांनी राज्य महिला आयोगाला एका पत्राद्वारे या निंदनीय आणि अमानवीय घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच यातील आरोपी विरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. निवेदनांवर अनिता कांबळे यांच्यासह लक्ष्मण हजारे, अमित जाधव, गणेश सोनवणे, लता सावंत, मीरा नाईकवाडे, तारा घोडके आणि उर्मिला गालफाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments