Breaking News

मराठा आरक्षण विद्यार्थी व युवा परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा - अशोक सुखवसे

 बीड : मराठा आरक्षण, समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यांबाबत राज्य सरकारला जाग यावी तसेच विद्यार्थी-युवकांना आरक्षण प्रक्रियेची क्लिष्ट असणारी कायदेशीर माहिती मिळावी,संभ्रम दूर व्हावेत, विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया, युवकांसाथीच्या योजना आदींबाबत योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी बीडमध्ये पहिल्यांदाच "मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषदेचे" आयोजन मराठा विद्यार्थी व युवकांच्या वतीने करण्यात येत आहे. याचे मुख्य मार्गदर्शक आ विनायक मेटे हे असणार आहेत. तर गायकवाड आयोगाचे माजी सदस्य श्री निमसे व सर्वोच्च न्यायालयातील वकील श्री पिंगळे, करांडे तसेच सिए बी बी जाधव, प्रभाकर कोलंगडे, सुदर्शन धांडे यांची उपस्थिती असणार आहे.

      

या परिषदेसाठी सुधीर काकडे, अशोक सुखवसे, राहुल टेकाळे, मुकुंद गोरे, ऍड शशिकांत सावंत, ऍड योगेश शेळके, ऍड योगेश टेकाडे,सोमनाथ मोटे, अजय शिंदे(वडवणी), महारुद्र जाधव हे पुढाकार घेत आहेत. प्रसिद्धीपत्रकाद्वारे या परिषदेच्या आयोजनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

  'मराठा आरक्षण विद्यार्थी व युवा परिषदेचे' आयोजन बीड शहरातील सूर्या लॉन्स येथे दि ०५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. सम्पुर्ण बीड जिल्ह्यातून या परिषदेसाठी मराठा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक - युवती उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. या परिषदेत मराठा आरक्षण, सर्वोच्च न्यायालयातील लढा, राज्य सरकारची भूमिका आदी बाबत चर्चा व माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. यासाठी आरक्षणातील अभ्यासक, तज्ञ, वकील व आरक्षण चळवळीतील अभ्यासकांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक अशोक सुखवसे यांनी दिली असून मराठा समाजाच्या विद्यार्थी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.


No comments