Breaking News

शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका; दिवसा उच्च दाबाने विद्युतपुरवठा शेतकऱ्यांसाठी सुरू करा - जिल्हाध्यक्ष काकडे


बीड :  जिल्ह्यातील आष्टी येथे बिबट्या धुमाकूळ घालत आहे, नरभक्षक बनला आहे, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे, विद्युत तारांना चिटकून, प्रवाह पाण्यात उतरून सिंचनासाठी रात्री शेतात गेलेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू होत आहे, आशा परिस्थितीत विद्युत पुरवठा हा दिवसा करावा अशी मागणी शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांनी केली आहे. 

   

आष्टीतील किन्ही येथील स्वराज सुनील भापकर हा 9 वर्षीय मुलगा, रा.भापकरवाडी, ता. श्रीगोंदा दिवाळीनिमित्त आपल्या आजीकडे आलेला होता. काल दुपारी साडे अकराच्या सुमारास स्वराजला नरभक्षक बिबट्याने उचलून नेले. गावातील नागरिकांनी स्वराजचा शोध घेतला असता स्वराज हा बिबट्याच्या हल्ल्याचा बळी ठरल्याचे कळाले सदरील घटना अत्यंत दुर्देंवी आहे. यापूर्वीही पंचायत समिती सदस्यांच्या पतींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिका-यांनी वेळीच बिबट्याचा शोध घेणे गरजेचे असून नागरिकांनी आता सावधानता बाळगणे गरजेचे आहे. मात्र याचबरोबर महावितरणने उच्च दाबाचा विद्युतपुरवठा हा दिवसा करावा जेणेकरून जंगली श्वापदे व विद्युत प्रवाहामुळे शेतकऱ्यांची जीवितहानी होणार नाही. महावितरणने विद्युतपुरवठा उच्च दाबाने दिवसा केला नाही तर शिवसंग्राम संपूर्ण जिल्ह्यात आंदोलने करेल असा इशारा शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.


No comments