Breaking News

मनसेचा वीज बील माफीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

 


बीड :
लॉकडाऊनच्या काळातील वीज बील माफ करण्यात येईल, असं महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलं होतं. परंतु वीज बीलावरून यु टर्न घेतला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार वीज बील माफ करण्याची मागणी करुनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मनसेने वीज बील माफीसाठी बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर  गुरुवारी (दि.२६) धडक मोर्चा काढला होता. 

एप्रिल महिन्यापासुन टाळेबंदीमुळे नागरीकांचे अर्थिक नुकसान झाले. व्यवसायंना घरघर लागली. नौकर्‍या गमावल्या आणि दुसर्‍या बाजुला आजाराची भिती सर्वच आघाड्यावर नागरीक लढा देत असतांना महाविकास आघाडी सरकारने नागरीकांना प्रचंड विजबील देऊन  शॉक दिला. 100 युनिट विजबील माफ करू असे जाहिर करून दुपटीने विजबीले पाठवली. या विरोधात बीड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

शहरातील छत्रपती संकुल येथुन निघालेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचे नेतृत्व मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, जेष्ट नेते गोविंद वनवे, जिल्हाध्यक्ष वैभव काकडे,श्रीराम बादाडे,राजेंद्र मोटे,सुमंत धस,शैलेष जाधव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई जगदाळे,कैलास दरेकर,नितीन सांगळे, विरेंद्र भालेकर, रेखाताई अंबुरे, जुबेर सिद्दीकी, सदाशिव बीडवे,कुणाला उगले, सुनिल जगताप, गणेश वाघमारे, दत्ता बहिरवाळ, सुरज जोगदंड,अशोक सुरवसे, रवि नेमाने,संगिताताई येवले, श्री.कृष्ण गायके,नवनाथ करांडे, कल्याण केदार,जयदिप गोल्हार, पेठ बीड विभाग प्रमुख अनवरजमॉ, वैजनाथ कळसकर, आत्माराम दिसले यांनी केले. जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी व सामान्य नागरीकांनी या मोर्चात मोठा सहभाग नोंदवला.


No comments