Breaking News

धानोऱ्याच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात 'दक्षता सप्ताह'शेख कासम । कडा 

तालुक्यातील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या धानोरा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक २७ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२० या कालावधीत 'दक्षता सप्ताह २०२०' कार्यक्रम संपन्न झाला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कैलास वायभासे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ सुभाष नागरगोजे, प्रा डॉ सविता खेडकर उपस्थित होते. यावेळी सतर्क भारत समृध्द भारत, माजी राष्ट्रपती तथा थोर वैज्ञानिक डॉ अब्दुल कलाम यांचे देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, राजकीय अराजकता व शांतता आदी विषयावर आपले विचार मांडत समाज घडविण्याचे काम शिक्षक हा करत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ कैलास वायभासे यांनी केले. तर सविता खेडकर यांनी या दक्षता सप्ताहच्या माध्यमातून सर्वांनी दक्ष राहवून समाज घडविण्याचे पवित्र कार्य करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रस्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ उस्मान पठाण यांनी तर आभार प्रा गहिनीनाथ एकशिंगे यांनी मानले.  यावेळी प्रा निसार शेख, प्रा अंजना गिरी, प्रा डॉ संजय झांजे, प्रा राजू शेलार, प्रा डॉ अमर शेख, प्रा विवेक महाजन, प्रा अजिनाथ गिलचे, प्रा बाळासाहेब बोराडे, प्रा सतिश तागड, प्रा सुभाष मोरे, किरण कर्डिले, सोमनाथ गिलचे, प्रल्हाद खोटे आदी उपस्थित होते.No comments