Breaking News

शिवसंग्रामचा इशारा, नगरपरिषद ताळ्यावर ..!


८ दिवसात थकलेल्या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करू; मुख्याधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन 

बीड :  गेल्या कित्येक महिन्यांपासून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते नगरपरिषदेकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात आलेले नाहीत. याबाबत वारंवार मागणी करूनदेखील आश्वासनाशिवाय दुसरे काहीही शहरातील लाभार्थ्यांच्या हातावर पडत नाही. पुढच्या आठवड्यात, महिन्यात असेच आश्वासने लाभार्थ्यांना मिळत असल्याने या लाभार्थ्यांनी शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे यांच्याकडे याबाबत लक्ष घालण्याची मागणी केली होती. शिवसंग्रामच्या वतीने याबाबत निवेदन देऊन ८ दिवसांत रक्कम जमा करण्यात यावी अन्यथा ठिय्या आंदोलानाचा इशारा देण्यात आला होता. 

   

नगरपरिषद येथे शिवसंग्राम शिष्टमंडळाने सोमवार दि २३ नोव्हेंबर रोजी भेट घेतल्यानंतर मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांनी येत्या ८ दिवसांत सर थकलेले हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, बार्शी नाका येथील शिवसंग्राम नेते सातिराम ढोले, अशोक ढोले, पेठ बीड येथील युवा नेते स्वप्नील हातागळे, सागर धनवे तसेच हप्ता थकलेले लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ८ दिवसांत पैसे खात्यावर जमा होणार असल्याचे पाहून सर्व लाभार्थ्यांनी शिवसंग्राम व आ विनायक मेटे यांचे आभार मानले आहेत.


No comments