Breaking News

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध आढावा बैठकींचे आयोजनबीड :  राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले असून या आढावा बैठकी पुढील प्रमाणे होणार आहेत. 

  

सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे कोव्हिड-19 संदर्भात आढावा बैठक. दुपारी 12.00 वाजता सन 2020-21 वर्षाकरिता जिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करणेबाबत, पाटबंधारे विभागाचा कामकाज आढावा, जलसंधारण विभागाचा कामकाज आढावा बैठक. दुपारी 1.30 वाजता भूसंपादन- नगर-परळी रेल्वे अतिरिक्त भूसंपादन आढावा, नॅशनल हायवे आढावा, कलम 18 व 28 प्रलंबित भूसंपादन आढावा, विविध विभागांमार्फत भूसंपादन देय मागणी बाबत आढावा बैठक. दुपारी 2.30 वाजता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा व सार्वजनिक मालमत्ता नुकसानीचा आढावा, सन 2018 व त्यापुर्वी पात्र शेतकऱ्यांना अद्याप पिकविमा मिळाला नसल्याबाबत आढावा, महसूल मंडळ निहाय पिक कापणी अहवालाबाबत आढावा बैठक. दुपारी 3.30 वाजता रोजगार हमी योजना विभागाच्या कामकाजाची आढावा बैठक. दुपारी 4.00 वाजता बीड नगर परिषद विविध योजना व विकास कामाची आढावा बैठक.No comments