Breaking News

माजलगावात भर चौकातील हॉटेल पंचवटी मध्ये चोरी,६५ हाजार रोकडसह मुद्देमाल लंपास


बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

शहरातील मुख्य रहदारीचा असणार्‍या भर आंबेडकर चौकातिल पंचवटी हॉटेल मध्ये दि २२ नोव्हेंबर रविवार रोजी पहाटे चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश करून ६५ हजार रुपये नगदी रोकड सह मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतत रहदारीचा असणार्‍या आंबेडकर चौकातील हॉटेल पंचवटी मध्ये अज्ञात चोरट्यांनी दि २२ नोव्हेंबर रविवार रोजी पहाटे दोन ते चारच्या दरम्यान खिडकीतून प्रवेश केला.यावेळी चोरट्यांनी काऊंटर मध्ये दि २१ नोव्हेंबर शनिवार रोजी दिवसभर केलेल्या व्यवसायातून जमा झालेली कॅश ६५ हजार रुपये व दोन मोबाईल एक एम आय कंपनीचा ज्याची अंदाजित किंमत १२ हजार ५०० तर दुसरा सॅमसंग कंपनीचा ज्याची किंमत ७ हजार रुपये व सीसीटीव्ही कॅमेर्‍याची डी व्ही आर मशीन अंदाजे किंमत 7 हजार रुपये असा एकूण ९१ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान सदरील प्रकार सकाळी हॉटेल मालकाच्या लक्षात आला असून हॉटेल मालक ईश्वरलाल भगवानजी भट्ट यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयांविरोधात माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे करत आहेत.


No comments