Breaking News

बीड येथे महिला व युवतींसाठी निशुल्क टेलरिंग प्रशिक्षण

बीड : होलिस्टिक स्किल आयोजित तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथे महिलांकरिता टेलरिंग या व्यवसायाचे प्रशिक्षण मोफत देण्याचे आयोजन केले आहे.भारत सरकार उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना शिक्षित व कमी शिक्षित युवती - महिलांसाठी रोजगार निर्मिती करिता वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन महिला सबलीकरण करण्याचे धोरण हाती घेतले आहे.

त्यातीलच टेलरिंग या व्यवसायाचे तीन महिन्याचे प्रशिक्षण बीडमध्ये तुलसी इंग्लिश स्कूल येथे घेण्यात येणार  आहे. सदरील कोर्स साठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी 8वी पास असणे आवश्यक असून वयोमर्यादा जास्तीत जास्त 45 वर्षे असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थीना ड्रेस कोड,बॅग, डायरी सह शैक्षणिक साहित्य पुरविले जाणार आहे. तेंव्हा हा कोर्स पूर्णतः निशुल्क असून अभ्यासक्रम तासिका 26 नोव्हेंबर 2020 पासून नियमित सुरु होतील. प्रशिक्षण पूर्ण होताच रोजगार संधी उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रिये करीता तुलसी इंग्लिश स्कूल,शासकीय आय.टी.आय.च्या मागे, संत ज्ञानेश्वर नगर,बीड.येथे शैक्षणिक गुणपत्रक,टी.सी., आधार कार्ड (छायांकित प्रती), पासपोर्ट फोटो सह आपला प्रवेश आजच निश्चित करा. प्रवेशासाठी अधिक माहिती करिता संपर्क: 8379994897, 8691809208,8605961871


No comments