Breaking News

मराठा समाजातील विद्यार्थी व युवकांसाठी बीड येथील परिषद महत्वाचीहरीश शिंदे, शैलेश सुरवसे, प्रेम धायजे, बालाजी गुंदेकर, अजय काकडे, श्रीराम येवले, अक्षय शिंदे यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

बीड :  राज्यात पहिल्यांदाच आपल्या बीड जिल्ह्यात "मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषदेचे" आयोजन मराठा विद्यार्थी व युवकांच्या वतीने करण्यात येत आहे. याचे मुख्य मार्गदर्शक आ विनायक मेटे हे असणार आहेत. तर गायकवाड आयोगाचे माजी सदस्य श्री निमसे व सर्वोच्च न्यायालयातील वकील श्री पिंगळे, करांडे तसेच सिए बी बी जाधव, प्रभाकर कोलंगडे, सुदर्शन धांडे यांची उपस्थिती असणार आहे. मराठा आरक्षण, समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यांबाबत राज्य सरकारला जाग यावी तसेच विद्यार्थी-युवकांना आरक्षण प्रक्रियेची क्लिष्ट असणारी कायदेशीर माहिती मिळावी,संभ्रम दूर व्हावेत, विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया, युवकांसाठीच्या योजना आदींबाबत योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी हि परिषद आयोजित करण्यात आली आहे.
       

'मराठा आरक्षण विद्यार्थी व युवा परिषदेचे' आयोजन बीड शहरातील सूर्या लॉन्स येथे दि ०५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. सम्पुर्ण बीड जिल्ह्यातून या परिषदेसाठी मराठा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक - युवती उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. या परिषदेत मराठा आरक्षण, सर्वोच्च न्यायालयातील लढा, राज्य सरकारची भूमिका आदी बाबत चर्चा व माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. यासाठी आरक्षणातील अभ्यासक, तज्ञ, वकील व आरक्षण चळवळीतील अभ्यासकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. आम्ही येत आहोत आपणही या असे आवाहन हरीश शिंदे, शैलेश सुरवसे, प्रेम धायजे, बालाजी गुंदेकर, अजय काकडे, श्रीराम येवले, अक्षय शिंदे यांनी केले आहे. 


No comments