Breaking News

गावातचं ग्रामस्थांचे प्रश्न सोडवणार - आमदार बाळासाहेब आजबेके. के. निकाळजे । आष्टी 

आपण पहिल्या टप्यात मोठी गावे व दुसऱ्या टप्यात मतदार संघातील प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांचे प्रश्न गावातच कसे सोडवता येतील यासाठी प्रयत्न करणार असून कोणत्याही कामांसाठी गावक-यांनी गावाच्या बाहेर जाण्याची गरज नाही. गावातील समस्या या सर्वांना बरोबर घेऊन चावडीवर बसूनच सोडवण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन आ.बाळासाहेब आजबे यांनी केले.

             

आष्टी मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे यांनी आज दि.21 पासून मतदार संघातील प्रत्येक गावात जाऊन चावडीवर जनसामान्यांत बसूनच प्रत्येकाच्या अडचणी ऐकून घेऊन, गावचे प्रश्न समजावून घेऊन ते त्याच बैठकीतून तात्काळ संमधीत अधिकाऱ्यांना फोन लावून प्रश्न  सोडविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमास जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत असुन जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.पहिल्याच दिवशी आष्टी तालुक्यातील देवीनिमगांव, डोंगरगण, दादेगाव, पिंपरीघाटा, देवळाली येथे भेट देऊन गावातील तलाठी, ग्रामसेवक, महावितरण, कृषीसहायक संमधीत यासह इतर वैयक्तीक व सार्वजनिक अडचणी गावातूनच सोडविल्या जात आहेत, चावडी भेटीच्या वेळी डोंगरगण, देवळाली येथील ग्रामस्थांनी आ.बाळासाहेब आजबे यांचे जंगी स्वागत केले. आपल्या चावडी भेटीत ग्रामस्थांनी वेगवेगळे तक्रारी नोंदवून त्या आमदार महोदयांनी तात्काळ संबंधित अधिका-यांना बोलून सोडविण्याच्या सुचना करत मार्गी लावल्या आहेत.त्यामुळे या चावडी भेटीने सर्वसामान्य नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.

तसेच आज दादेगांव गावातील एक विद्युत पोल न बसविल्यामुळे गावात एक्सप्रेस वे वीज मिळत नव्हती स्वत; आमदार बाळासाहेब आजबे यांनी गावात जाऊन तेथून महावितरण चे संबंधित अधिकारी यांना सुचना देताच तात्काळ आजची आजच कामाला सुरूवात झाली असून उद्या गावाला पुर्ण क्षमतेने विज मिळणार आहे.असे एक ना अनेक प्रश्न असो गावातून वस्ती रस्ता यासह इतर प्रमुख व वैयक्तीक अडचणी या चावडी बैठकीच्या माध्यमातून सुटणार आहेत.एवढेच नाही तर गावात यापुढे कोणती कामे करणे आवश्यक आहेत त्यांची नोंद घेऊन त्या कामांना प्राधान्याने मार्गी लावण्यात येणार आहेत ,कोरोना महामारीमुळे बरेच दिवसापासून जनतेच्या भेटीला येता आले नाही आपण मला आमदार म्हणून मतदार संघाची सेवा करण्याची जी संधी दिली आहे त्यानुसारच सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण बांधील असल्याचे हि यावेळी बोलतांना आ. आजबे यांनी सांगितले.

आज पासून सुरू केलेला चावडी दौरा हा सुरूवातीला मतदार संघातील प्रमुख गावात असून नंतरच्या टप्प्यात हा दौरा प्रत्येक गाव, वाडी ,तांडा याठिकाणी प्रत्येक विभागाचे अधिकारी समावेत घेऊन पुर्ण करून गावातील प्रश्न गावातच सोडिण्यावर भर देणार आहोत असं आमदार बाळासाहेब आजबे म्हणले. 


No comments