Breaking News

विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप मडके यांनी अनाथांची दिवाळी केली गोड


विजयसिंह पंडितांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी गेल्या दहा वर्षांपासून बालग्राम मधील अनाथांसाठी मदतीचा अखंड यज्ञ सुरूच

गेवराई : बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व विजयसिंहजी पंडित यांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कट्टर समर्थक तथा राष्ट्रवादी सोशल मिडिया सेलचे तालुकाध्यक्ष संदीपजी मडके हे दरवर्षी सहारा बालग्राम अनाथालय येथील बालकांना विविध स्वरूपात मदत करत असून गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या ही अखंड परंपरा चालूच असून आजही विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी बालग्राम येथे जाऊन येथील अनाथांची दिवाळी गोड केली आहे. 

दरम्यान त्यांच्या मनात आपल्या नेत्याबद्दल असलेले प्रेम व निष्ठा त्यांच्या या कार्यातून दिसून येत आहे. सलग दहा वर्षांपासून त्यांचा अखंड मदतीचा यज्ञ चालू असून आज रोजी त्यांनी येथील अनाथालयात जाऊन या सर्व बालकांना मिठाई व खाऊ व धान्य देत या अनाथांची दिवाळी गोड केली. यावेळी संदीप मडके यांच्या समवेत नगरसेवक शाम काका येवले, दत्ताभाऊ पिसाळ, दत्ताभाऊ दाभाडे, गोरक्षनाथ शिंदे, शेख मन्सूर भाई, अनिल मोटे, राजाभाऊ कळसाई, पंकज पाटेकर, अंगद माने,शेखर मोटे,ऍड प्रदीप मडके, अजय भैय्या बने, बाबा शिंदे,संग्राम पंडित, ऋषिकेश मोटे, गोटू वाघमारे, अक्षय काळे,अक्षय परदेशी आदींची उपस्थिती होती. यावेळी बालग्रामचे संचालक संतोष गर्जे यांच्यासह सर्व बालकांनी विजयसिंह पंडित यांना उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करून संदीप मडके यांचे आभार मानले.


No comments