Breaking News

पदवीधर निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वपूर्ण बैठक!

 


सर्वांनी उपस्थित रहावे- लक्ष्मण पौळ, बाजीराव  धर्माधिकारी यांचे आवाहन

परळी वैजनाथ : विधान परिषदेसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची आज दि.५ रोजी महत्त्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

          

विधान परिषदेसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घोषित झाली असून 1 डिसेंबर रोजी मतदान संपन्न होणार आहे.या निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा कालावधी अत्यल्प असल्याने आपल्या उमेदवाराच्या प्रचाराच्या पूर्वतयारीसाठी व जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तालुक्याची महत्वपूर्ण बैठक राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या "जगमित्र' संपर्क कार्यालयात  गुरुवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 11 वाजता आयोजित केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व  नगरसेवक, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, गणप्रमुख, गटप्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.



No comments