Breaking News

नगरपंचायत निवडणूकीपेक्षा पदवीधर निवडणुकीकडे लक्ष द्या -आ. सुरेश धस


के. के. निकाळजे । आष्टी 

नगरपंचायतच्या निवडणुकीला अजून बराच कार्यकाळ असून उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधू नये.सध्याची सुरू असलेली पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचा प्रचार करावा व उमेदवार निवडून आणावा असे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले.

ते आष्टी शहरात सायंकाळी ७ वा.शनिचौकातील आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरपंचायत निवडणूक इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष भारत मुरकुटे,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,राहुल मु्थ्था, हे उपस्थित होते.

पुढे बोलतांना आ. धस म्हणाले की, नगरपंचायत निवडणूकीसाठी कोणीही कामाला लागू नये.कारण कोरोना महामारीमुळे निवडणूकीबद्दल अनिश्चितता आहे. आजी व माजी आमदारांनी बैठक घेतल्याने आपल्याला सुद्धा इच्छुकांची बैठक बोलावली. आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणार आहोत.इच्छुकांनी देखील उमेदवारी मागताना सामाजिक कार्यात आपले काय योगदान आहे .हे तपासूनच उमेदवारी मागावी.सामन्यातील सामन्य कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. घटने सगळ्याला एक सारख्या मताचा अधिकार दिला आहे.

त्याचबरोबर आपल्याला गावांमध्ये शांतता हवी आहे.या गावात सगळ्या जातीचे लोक आहेत.हातावर पोट भरणारे आहेत.जो उमेदवार अडचणीला उभा राहातो. त्यालाच लोक निवडणुकीत ओळखतात.असे अचानक येऊन कोणी पण निवडणूक लढू शकत नाही. आजची जनता फार चाणाक्ष आहे. या निवडणुकीत काही जुने,काही नवीन चेहऱ्याना संधी देणार आहोत.

ही एकट्याची निवडणूक नाही आपल्या सगळ्याची निवडणूक आहे.यामध्ये सगळ्या समाजातील घटकांतील उमेदवारांना आपण संधी देणार आहोत. आष्टी हे मंडल आयोगचे शहर आहे.सर्व निर्णय आष्टी शहराच्या हितासाठी घेतलेले आहेत. कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला राम मंदिरासाठी आपण पुढाकार घेऊन वर्गणी करून भव्यदिव्य राम मंदिर आष्टी शहरात उभारले आहेत. शहरातील सर्व वादातील प्रकरणे मी संपवले आहेत.तरी नगरपंचायत निवडणूकीला आणखी बराच कार्यकाळ असून सध्या सुरू असलेल्या पदवीधर निवडणूकीसाठी कामाला लागा असे आदेश आ. सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांना शेवटी बोलताना दिला. यावेळी जिया बेग, विनोद रोडे, शफी शेख, शरीफ शेख, गणेश शिंदे, महेश हंबर्डे, मनोज सुरवसे, बबन कदम, अक्षय धोंडे, प्रविण कदम, शैलेश कुलकर्णी, बाळासाहेब घोडके, सतीश टकले आदी उपस्थित होते.


No comments