Breaking News

ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहा - आण्णासाहेब चौधरी


के. के. निकाळजे । आष्टी  

राष्ट्रवादी, कांग्रेस, शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आष्टी तालुक्यातील कासारी येथील साईदत्त मंगलकार्यालाय येथे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता होणाऱ्या सभेस आष्टी तालुक्यातील सर्व पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आष्टी तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी यांनी केले आहे.

           

मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. हायटेक प्रचार यंत्रणा आणि मागील दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आ. सतीश चव्हाण यांचा विजय निश्चित आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ व्यापक असून यामध्ये 78 तालुके आणि 10 हजार गावांचा समावेश आहे. आ. चव्हाण यांच्या विजयात आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघाचा नेहमीच सिहांचा वाटा राहिला असल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी अनेक वेळा जाहीर सभेत बोलून दाखवले आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आष्टी जवळील कासारी येथील साईदत्त मंगलकार्यालात शनिवार दि. 28 नोव्हेंबर रोजी ससकाळी 10.30 वाजता होणाऱ्या सभेला आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदिप क्षीरसागर, माजी आ. अमरसिंह पंडित, माजी आ. साहेबराव दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे  आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेत. आष्टी तालुक्यात होणाऱ्या विजयी सभेस तालुक्यातील सर्व पदवीधर मतदारांनी तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी यांनी केले आहे.


No comments