Breaking News

शेतकरी विरोधी कायदया विरोधात किसान संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

 


बीड  : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी कायदे, वीज दरवाढ करणारे विधेयक, मालाची प्रचंढ आयात व निर्यात बंदी यामुळे देशातील शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. त्याच बरोबर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या मुळे शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. त्यासाठी आज लोकतांत्रिक जनता दलाच्या राष्ट्रीय महासचिव प्रा. सुशीलाताई मोराळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोहन जाधव, सलीम बापु, सुहास जायभाये, दत्ता प्रभाळे, यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. 

या निवेदनात सर्व शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकऱ्यांची देशव्यापी कर्जमुक्ती करा, वीज दरवाढ करणारे विधेयक मागे घ्या यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत, या मागण्या गांभीर्याने घेऊन सरकारने शेतकऱ्यांना संकटातुन वाचवावे नसता देशात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी दिला आहे.


No comments