Breaking News

आष्टी तालुक्यातील सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे फेरपंचनामे करून नुसकान भरपाई मिळावी


आ.बाळासाहेब आजबे यांची मंत्रिमहोदयांकडे आग्रही मागणी 

के. के. निकाळजे । आष्टी

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात मध्ये आष्टी व पाटोदा तालुक्यात झालेल्या सततच्या पावसामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीचे फेर पंचनामे करून या भागातील शेतकऱ्यांना नुसकान भरपाई मिळावी अशी आग्रही मागणी आपण कृषिमंत्री दादासाहेब भुसे, पालकमंत्री धनंजय मुंडे व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.   

        

आष्टी तालुक्यात सप्टेंबरव व ऑक्टोबर महिन्यामध्ये सततच्या झालेल्या पावसामुळे कांदा, सोयाबीन, तूर, कापूस ,या काढनिस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ,शासन नियमाप्रमाणे अतिवृष्टी व महापूर यामुळे पिकांचे पंचनामे करून झालेल्या नुसकान ग्रस्त भागातील लोकांना मदत देणे अपेक्षित असले तरी सततच्या पावसामुळे ही मोठ्या प्रमाणावर काढणीस आलेले पीके बाधित झाले आहेत,  या अगोदरही आपण जिल्हाधिकारी व वरिष्ठ पातळीवरही याबाबत पाठपुरावा केलेला आहे. 

  या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात   पिकांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे  सततच्या पावसामुळे झालेले नुसकानीचे फेर पंचनामे करून शासनाने या भागातील शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब, कृषी मंत्री दादासाहेब भुसे,  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आपण स्वतः भेटून केली असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन ही मंत्री महोदय यांनी दिले असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी सांगितले.


No comments