Breaking News

साळेगाव जवळ प्लायवूडने भरलेला टेम्पो उलटला


गौतम बचुटे । केज 

कडून मानवतच्या दिशेने जाणारा एक प्लायउड खचाखच भरलेला टाटा कंपनीचा ५०७ टेंपो मागील बाजूचे टायर फुटल्यामुळे रोडच्या मध्यभागात पलटी झाला. 

या बाबतची माहिती अशी की, दि. २० नोव्हेंबर, मंगळवार रोजी रात्री ८:३० वा.  कळंब कडून मानवत जिल्हा परभणी येथे प्लायवुड घेऊन जाणारा टाटा ५०७ क्र (एम एच-२०/ए ए-३०४०) टेम्पो केज-कळंब रोडवर साळेगावच्या विद्युत उपकेंद्रा जवळ टेम्पोचे मागील बाजूचे उजवी कडील टायर फुटल्याने रस्त्याच्या ऐन मध्यभागी पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड गृहरक्षक दलाच्या जवानांना सोबत तात्काळ घटनास्थळी हजर झाले.

No comments