Breaking News

शाळा सुरु करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय शासन पातळीवरूनच स्थगित करावा; स्थानिक पातळीवर सोपवुन संभ्रम निर्माण करु नये- बंडू अघावपरळी वैजनाथ :  देशात व  राज्यात सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा विषाणूचा वाढत आसलेला संसर्ग लक्षात घेता राज्यातील दि.२३ नोव्हेंबर पासून शाळा सुरु करण्याचा घेतलेला निर्णय राज्य शासनानेच स्थगित करावा तो स्थानिक प्रशासन पातळीवर सोपवुन संभ्रमाची व गोधंळाची परिस्थिती निर्माण करू नये असे अवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे ता. सचिव बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे केले आहे.     

                       

राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी राज्यात कोरोना संसर्ग खूप आटोक्यात व नियंत्रणात होता.आजच्या परिस्थितीत देशात व राज्यात दुसऱ्या लाटेच्या रुपात वाढत आहे. सर्व व्यवसाय,उद्योग,वाहतुक व मंदिरे सुरू केल्यामुळेना सर्व ठिकाणी लोकांची गर्दी, आवक - जावक वाढली आहे. तिला आटोक्यात व नियंत्रणात आणण्यासाठी प्ररत्न ठेवले पाहिजेत. लोकांचे मास्क वापरण्याचे प्रमाण कमी आहे.सोशल डिस्टन्स पाळले जात नाही.लोकांकडून कोवीड-१९ नियमांचे कसे सक्तीने पालन करुन घेता येईल व संसर्ग नियत्रंणात ठेवता येईल यावर साशनाने व प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे. शाळा सुरु करुन विनाकारण कोरोनाला निमंत्रित करु नये. शाळा सुरु केल्यातरी पालक आपल्या पाल्याला आताच्या परस्थितीत शाळेत पाठवण्याच्या मनस्थितीत नाहीत. 

म्हणून शासनाने शाळा सुरु करून उगीच विनाकारण विद्यार्थी-पालक, शिक्षक यांच्या जिवाशी खेळू नये. निर्णय जबरदस्तीने घेतला तरी काही दिवस 25%   पालक सुध्दा विद्यार्थी शाळेत पाठवणार नाहीत. त्यासाठी सध्या ऑनलाईन शिक्षण शिक्षण जे चालू आहे तेच माध्यमातून शाळा व शिक्षण सुरू ठेवावे त्याचा खेळखंडोबा शाळा सुरू करून करु नये असे वाटते.शाळा सुरु करून काही दिवसात त्या पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्याचे हसू करून घेऊ नये. म्हणून शाळा सुरू करण्याच्या निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा व कोरोणावर लस आल्यावरच शाळा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन बंडू अघाव यांनी शासनास प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


No comments