Breaking News

बोगस बीटी बियाणे कंपन्यावर कार्यवाही करा : भाई अॅड नारायण गोलेपाटील

 


बाळासाहेब आडागळे । माजलगाव   

बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी बीटी कापसाच्या बियाण्यांची पेरणी शेतकऱ्यांनी केली असून, या बीटी बियाण्याच्या कापसाच्या बोडांना कीड लागत आहे, योग्य प्रमाणात माल न लागणे लागलेला माल गळणे, बर्‍याचशीअंशी नंपुसक राहणे अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च  व नुकसान भरपाई म्हणून कंपन्यांनी हेक्‍टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नेते ॲड. भाई नारायण गोले पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

  

तालुक्यातील शेतकऱ्यांना कापसाच्या बियाण्यात बीटी कंपन्यांनी फसवले असल्याचे निदर्शनास येत असून, लागवड केलेल्या कापसात किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे, तसेच योग्य प्रमाणात माल न लागणे, लागलेला माल गळणे, तसेच अनेक झाडे नंपुसक राहणे इत्यादी तक्रारी असून याबाबत प्रत्यक्ष पाहणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली. या पाहणीत तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले, त्यामुळे अशा फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने हेक्‍टरी एक लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी करून संबंधित फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनास संभाजी ब्रिगेड व इतर संघटनांनी ही पाठिंबा दिला आहे निवेदनावर भाईॲड. नारायण गोले पाटील, रंजीत जाधव, लहू सोळंके, योगेश सोळंके, नानासाहेब पवार, भागवत पवार, श्रीकृष्ण थोरात, सुभाष थोरात, गणेश कुंभार, सिध्देश्वर लांडे  संभाजी चव्हाण,प्रमोद लांडेआदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.No comments