Breaking News

माजलगावात दिवाळी फराळाचे वाटप - माजलगाव विकास प्रतिष्ठाणचा पुढाकार


बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

गेल्या सोळा वर्षांपासुन येथील माजलगाव विकास प्रतिष्ठाणच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दत्तक 308 मुले - मुलींना दिवाळी फराळाचे वाटप दि. 4 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. 


यावेळी व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, पत्रकार दत्ता येवले, परमेश्वर गोरे, भगवान शेजुळ, पद्माकर काळे यांची उपस्थिती होती. मागील सोळा वर्षांपासुन शाळा सुरू होतांना जुन महिण्यात या प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते तर दिवाळीनिमीत्त फराळाच्या साहित्याचे वाटप करण्यात येते. याही वर्षी दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात आले होते.दत्तक घेण्यात मुलां - मुलींच्या कुटूंबीयांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने मागील सोळा वर्षांपासुन दिवाळी फराळाचे वाटप तसेच शाळा सुरू होताच शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. यावर्षी निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीमुळे प्रातिनिधीक स्वरूपात फराळाचे वाटप करण्यात आले असुन उर्वरीत सर्व दत्तक मुलां - मुलींना दिवाळी फराळाचे वाटप होणार असल्याची माहिती माजलगाव विकास प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा मंगलाताई प्रकाश सोळंके, सचिव निलाताई देशमुख यांनी दिली आहे.


No comments