Breaking News

समाजकल्याण कार्यालयाकडून पिडिताला मिळणाऱ्या पुर्नवसन निधी मधून दलाल घेतायत अर्धी रक्कम राजु पैठणे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार


बीड : 
अनुसूचित जाती जमाती मधील अत्याचार होणाऱ्या पिडितास व पिडितेस शासनाकडून पुर्नवसन निधि मिळतो, हा निधि पिडतेस मिळवून देतो म्हणून काही दलाल व सुशिक्षित लोक व सामाजिक कार्यकर्ते हे या लोकांकडून अर्धी रक्कम घेत असल्याबाबत आमची संघटना दिपक भाऊनिकाळजे सामाजिक विकास संघटनेकडे तक्रारी आलेल्या आहेत तरी जिल्हाधिकारी, समाज कल्याण अधिकारी यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालावे व चौकशी करून दलाल कसे दुर होतील या बाबत प्रयत्न करावे अशी मागणी दिपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना बीड जिल्हा अध्यक्ष राजू पैठणे यांनी केली आहे.

जर कोणास तक्रार असेल तर दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना बीड यांच्याकडे खालील नंबरवर सर्पक साधावा जिल्हाअध्यक्ष राजू पेठणे मोबाईल क्रमांक 9921094307 सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत साबळे मोबाईल क्रमांक 8668382166 , सामाजिक कार्यकर्ते बाळू काकडे मो. 9657102158 या नंबरवर सर्पक साधावा. असे आव्हान दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पठणे यांनी केले आहे.


No comments