Breaking News

शेतीसाठी दिवसभर वीजपुरवठा सुरू ठेवण्याची शिरूर भाजपची मागणीशिरुरकासार :  तालुक्यात रब्बी हंगामातील पिकं मोठ्या प्रमाणावर बहरली आहेत.त्यामुळे बळीराजा रात्रपाळी करून पिकांना पाणी देत आहे.परंतु तालुक्यात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले असून यापुढे रात्रीचा वीजपुरवठा करण्या ऐवजी तो दिवसभर सुरळीत ठेवण्यात यावा अशी मागणी तालुका भाजपच्या वतीने इंजि.एम.एन.बडे यांच्यासह सरपंच देविदास गर्कळ,सरपंच संघटनेचे ता.अध्यक्ष माऊली नागरगोजे,किशोर खोले,संजय शिरसाठ,सामाजिक कार्यकर्ते पै. माऊली पानसंबळ यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार श्रीराम बेंडे यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्याकडे केली आहे.

आष्टी तालुक्यातील सुर्डी येथे रात्री पाणी देत असताना नागनाथ गर्जे या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची दुर्दैवी घटना घडली  होती.त्या पार्श्वभूमीवर सदरील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वीज नियमनात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

No comments