Breaking News

गोर- गरिबांचं राशन दुकानदाराने खाल्लं !

अंगठे घेतले पण राशनचं नाही दिलं;  चाटगावच्या ग्रामस्थांची तहसीलदारांकडे तक्रार 

बाबासाहेब देशमाने । दिंद्रुड

शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांना राज्यात मागील काळामध्ये तीन ते चार महिने राशन दुकानांमार्फत मोफत धान्य देण्याची योजना राबवली होती. पण मौजे चाटगाव येथील  दुकानदाराने चक्क कोरोनाच्या काळामध्ये आलेले तीन ते चार महिन्याचे धान्य गायब केले आहे, अशी तक्रार गावकऱ्यांनी तहसीलदार धारूर यांच्याकडे दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, धारुर तालुक्यातील चाटगाव येथील उध्दव केकाण यांसह गावकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की स्वस्त धान्य दुकानदार पांडुरंग शेषराव केकाण हे गावातील लोकांचे धान्य येण्याच्या अगोदर मशीन वर अंगठे घेतात व सांगतात की माल आल्यानंतर मी तुम्हाला देतो ऑक्टोबर महिन्यामध्ये अंगठे घेतलेच परंतु एकालाही धान्य देण्यात आले नाही व वाटपही करण्यात आले नाही.

विनामावेजा आलेले शासकीय धान्य हरभरा दाळ, गहू, तांदूळ आदी सामान या दुकानदाराने एकाही ग्राहकाला वाटप केले नाही. सदरील अर्जदारांनी दुकानदार पांडुरंग केकान यांना विचारले असता दुकानदाराने सांगितले की धान्य येत नाही मी कुठून तुम्हाला देणार तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा नाहीतर कलेक्टर साहेबांकडेजा मी धान्य देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा, अशी उद्धट भाषा  वापरली असल्याचे सांगितले. शासन दप्तरी दाखवण्यासाठी प्रत्येक महिन्याला धान्य देतो म्हणून ग्राहकांचे आंगठे घेतात व धान्य वाटप करत नाहीत. म्हणून सदरील स्वस्त धान्य दुकानदार केकान यांच्या धान्य दुकानाची चौकशी करावी आणि गावकऱ्यांना कोरोनाच्या काळातील मोफत आलेले धान्य तसेच ऑक्टोबर महिन्यातील अंगठे घेऊन न दिलेले धान्य देण्यात यावे, अशी तक्रार गावकऱ्यांनी केली .

zNo comments