Breaking News

केजच्या कोव्हीड केंद्रातील आहाराचा दर्जा बाबत रुग्णाच्या तहसीलदारांकडे तक्रार

बेचव व निकृष्ट जेवण मिळत असल्याच्या तक्रारी

गौतम बचुटे । केज  

येथील कोव्हीड केंद्रात व्यवस्थित आहार दिला जात नसल्याच्या तक्रारी रुग्ण करीत असून त्या पैकी काही रुग्ण तर थेट तहसीलदार यांच्याशी संपर्क साधाला आहे.

केज येथील कोव्हीड केंद्रात रुग्णांना दिला जाणारा आहार हा निकृष्ट आणि बेचव असल्याच्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मागील आठवड्यात येथील उपचार घेत असलेल्या रुग्णांनी स्वतः  तहसिलदार यांच्याशी संपर्क साधून येथे दिला जात असलेल्या आहार हा निकृष्ट आणि बेचव असल्याची तक्रार करून येथील आहारातील गोरखधंदा याची माहिती दिली होती. दरम्यान या बाबत तहसीलदार यांनी कान उघाडनी केली होती व त्यामुळे अन्न पुरवठा करणारे ठेकेदार यांच्या माणसांनी रुग्णांना धमकी दिली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.No comments