Breaking News

मराठा आरक्षण विद्यार्थी व युवा परिषदेला संत - महंतांचा आशीर्वाद लाभणार

महंत हभप शिवाजी महाराज, हभप इंगळे महाराज, हभप मेंगडे महाराज, हभप लक्ष्मण महाराज, हभप नाना महाराज यांचीही असणार उपस्थिती 

बीड : "मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषदेचे" आयोजन मराठा विद्यार्थी व युवकांच्या वतीने करण्यात येत आहे. या परिषदेला संत महंतांचा शुभाशीर्वाद देखील लाभणार असून महंत हभप शिवाजी महाराज, हभप इंगळे महाराज, हभप मेंगडे महाराज, हभप लक्ष्मण महाराज, हभप नाना महाराज यांचीही असणार उपस्थिती असणार आहे.

     

राज्यात पहिल्यांदाच अशी परिषद आपल्या बीड जिल्ह्यात होत आहे. याचे मुख्य मार्गदर्शक आ विनायक मेटे हे असणार आहेत. तर गायकवाड आयोगाचे माजी सदस्य श्री निमसे व सर्वोच्च न्यायालयातील वकील श्री पिंगळे, करांडे तसेच सिए बी बी जाधव, प्रभाकर कोलंगडे, सुदर्शन धांडे यांची उपस्थिती असणार आहे. 

     

मराठा आरक्षण, समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यांबाबत राज्य सरकारला जाग यावी तसेच विद्यार्थी-युवकांना आरक्षण प्रक्रियेची क्लिष्ट असणारी कायदेशीर माहिती मिळावी,संभ्रम दूर व्हावेत, विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया, बेरोजगार युवकांसाठीच्या योजना आदींबाबत योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी हि परिषद आयोजित करण्यात आली आहे.



No comments