Breaking News

ना. धनंजय मुंडे यांच्यामुळे ५ गावच्या शिंगल फेजचा प्रश्न मार्गी-तुळशीराम पवार


पालकमंत्र्यांनी तात्काळ योजना चालु करण्यासाठी सुचना केल्याने काम झाले सुरू 

परळी वैजनाथ  : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यामुळे तालुक्यातील पाच गावाच्या सिंगल फेंज रोहित्राचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुळशीराम पवार यांनी सांगितले आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे या गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

        

येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत आंबाडकर यांनी आज दि.02 नोव्हेंबर रोजी मिरवट येथे परिसरातील शेतकऱ्यांनी शिंगल फेज योजना चालु करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा ना धनंजयजी मुंडे साहेब यांचे अत्यंत विश्वासू सहकारी तुळशीराम पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आंबाडकर, इंजिनिअर देऊळकर, इंजिनिअर निंबाळकर,  सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन भरतराव इंगळे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विश्वनाथ इंगळे, भाऊसाहेब इंगळे, माऊली इंगळे,रतन इंगळे, साहेब भदाडे अदि मान्यवर उपस्थित होते. 

         

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुळशीराम पवार म्हणाले की,  गेली २ वर्षांपासून बंद असलेली मिरवट, कासारवाडी, वैजवाडी, मलकापूर येथील सिंगल फेज योजना चालु करण्यात आली हे फक्त पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्यामुळे हि योजना खुप दिवसांनी कार्यान्वित झाली आहे. या रोहित्रासाठी लागणारे साहित्य भेटत नव्हते तेही उपलब्ध करण्यासाठी कार्यकारी अभियंता आंबाडकर यांना मा धनंजय मुंडे साहेबांनी सुचना दिल्या व या कामी नप चे गटनेते  वाल्मीक आण्णा कराड व जिप चे गटनेते अजय मुंडे यांनी हि वेळोवेळी अधिका-यांना फोन करून तात्काळ योजना चालु करण्यासाठी सुचना दिल्या म्हणून या परिसरातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ना.धनंजयजी मुंडे साहेब यांचे व तसेच वाल्मीक आण्णा कराड,व अजय मुंडे साहेब यांचे आभार मानले आहेत. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिपान इंगळे, तिरमुक भदाडे , हनुमान राजेभाऊ इंगळे, कारभारी भदाडे ,शाम चिखलबिडे यांनी प्रयत्न केले. यावेळी लाईनमन सोळंके, दिलीप सुरवसे, अच्युत इंगळे, तुळशीराम इंगळे, कारभारी इंगळे, दत्ता पवार,सतिश इंगळे, भगवान भदाडे,माणीक राव इंगळे,शंकर भदाडे,अमोल सुरवसे, कैलास पोपळगट,शेख मुरतूज,शेख जमीर,शेख वजीर ,महादु पवार, हानुमान सिताबराव,दता भदाडे,दता इंगळे, पंडितराव भदाडे,सुनिल इंगळे,अनिल सुरवसे, अदि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महारुद्र कसबे यांनी केले तर आभार साहेब भदाडे यांनी मानले. परळी मतदारसंघातील कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठी खरे पालकत्व म्हणून धनंजय मुंडे यांनी करून दाखवले आहे. अनेक वर्षेचा प्रश्न त्यांनी तात्काळ सोडविल्यामुळे साहेबांचे तुळशीराम पवार यांनी आभार मानले आहेत.


No comments