Breaking News

कारमधील २४ लाख ९७ हजार रुपयांची बॅग चोरट्याने केली लंपास ; अज्ञात चोरट्या विरुद्ध परळी पोलिसात गुन्हा दाखल


परळी :  येथील मोंढा मार्केट मध्ये औरंगाबादहुन आलेल्या एका व्यापाऱ्यांची लॉक केलेल्या कारमधून 24 लाख 97 हजार रुपयाची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. या घटनेने परळी शहरासह व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध  शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की परळी शहरातील मोंढा मार्केटमध्ये औरंगाबाद येथील व्यापारी संजय गंगवाल हे गुरुवारी सकाळी परळी शहरातील पेपर कप विक्री वसुलीच्या निमित्ताने आले होते. त्यांनी त्यांची कार मोंढा मार्केट येथील हनुमान मंदिराच्या पाण्याच्या टाकीजवळ वाहन चालकास लावण्या सांगितले. यानंतर गंगवाल हे गाडीतून उतरून एका व्यापाऱ्याकडे गेले तर चालक गाडी लॉक करून एका हॉटेलमध्ये नाष्टा गेला होता. याच वेळेत अज्ञात चोरट्यांनी कारची लॉक उघडून आतील पैशाची व वाहनचालकाच्या कपड्याची बॅग पळविली. नाश्ता करून आलेल्या कार चालकाला कारचा दरवाजा उघडलेले दिसला. त्यांनी लागलीच गंगवाल यांना बॅग चोरीचा प्रकार सांगितला. सदरील बॅगमध्ये वसुली केलेली 24 लाख 97 हजार रुपयाची रक्कम होती. याप्रकरणी औरंगाबाद येथील व्यापारी संजय गंगवाल यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खरात हे करीत आहेत.No comments