Breaking News

आष्टीच्या पारधी वस्तीवर बिबट्याचे दर्शन तर वारंगुळे वस्तीजवळ आढळल्या पाऊल खुणाके. के. निकाळजे । आष्टी

बिबट्याच्या दहशतने आष्टी तालुका गर्भगळीत झाला असून बिबट्याला पकडण्याचं आव्हान वन विभागासमोर उभं ठाकल आहे. त्यातच वारंगुळे वस्तीजवळ दोन बिबट्याच्या आढळल्या पाऊल खुणा तर पारधी वस्तीवर बिबट्या पाहताच एकच आरडाओरड सुरु झाल्याची चर्चा आज दिवसभर तालुक्यात होत होती. 

आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ संचालक विठ्ठलराव बनसोडे  यांच्या भगवान महाविद्यालया बाजूला असलेल्या वारंगुळे वस्तीनजीक एका शेतात गुरुवारी सकाळी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. दरम्यान याची माहिती वन विभागाला कळविल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी याची पाहणी केली असता त्याठिकाणांहून दोन बिबट्या गेल्याचे निष्पन्न झाले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  तसेच येथून जवळचं असलेल्या पारधी वस्तीवर सकाळी ११: ३० वाजण्याच्या सुमारास काही लोकांना बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरवात केली, अशी चर्चा तालुकाभर होत आहे. बिबट्यामुळे नागरिक दहशतिखाली असून  बिबट्याचा शोध वन विभागाचे कर्मचारी घेतायत. 


No comments