बेपत्ता विकास नेहरकरचा तपास लावा-जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र
गौतम बचुटे । केज
तालुक्यातील पिसेगाव येथून एक वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला विकास नेहरकर याची चौकशी करून तपास करावा असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे.
याबाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील अवैधरित्या दारूचा व्यवसाय करणारा विकास बाबासाहेब नेहरकर राहणार पिसेगाव हा दि. ८ सप्टेंबर२०१९, रविवार रोजी सायं. पिसेगाव येथून त्याची स्विफ्ट डिझायर गाडीने (गाडी क्र. एमएच- १४/सीएक्स-७८१६) या तारखेपासून बेपत्ता झालेला आहे. तो वापरत असलेली गाडी स्विफ्ट डिझायर गाडी ही बीड तालुक्यातील वंजारवाडी जवळील शेंडगेवस्ती फाट्यावर जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती.
या बाबत केज पोलीस स्टेशनला त्याची आई सुदामती नेहरकर यांच्या तक्रारी वरून दि.१२ सप्टेंबर २०१९ रोजी ३८/२०१९ तो हरवल्याची तक्रार दाखल केेली होती. परंतु त्याचा तपास न लागल्यामुळे तात्कालिन जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोतद्दार यांनी दि. १३ जानेवारी २०२० रोजी याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांगुने यांच्याकडे वर्ग केला होता. त्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना तपासा दरम्यान
विकासच्या आई-वडिलांनी त्यांच्या जबाबात पोलीस उपविभागीय कार्यालयातील एक कर्मचारीऱ्यासह पाच जणांनी विकासाचे अपहरण करून घातपात केला असल्याचा संशय व्यक्त केला होता.
तरी अद्यापही विकास नेरकरचा तपास लागलेला नाही. त्यामुळे त्याचा घातपात या संशयितांनी केला असल्याचा आरोप करीत त्याचा तात्काळ तपास करावा. या मागणीसाठी दिनांक २ नोव्हेंबर पासून बेपत्ता विकास नेहरकरची वृद्ध आई सुदामती नेहरकर ही जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर उपोषणाला बसली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी बीड यांनी एका पत्राद्वारे पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रकरणी तात्काळ तपास करुन विकास नेरकरचा शोध घ्यावा. असे त्यांना कळविले आहे.
No comments