Breaking News

साळेगाव सामूहिक बलात्कार करून खून प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी


गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील साळेगाव येथे सामूहिक बलात्कार करून महिलेचा गळा आवळून खून केल्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि.३० रोजी केज तालुक्यातील साळेगाव येथे दस्तगिराचा माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेता जवळ सकाळी ८:३० ते ९:०० वा. दरम्यान शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या अश्विनी समाधान इंगळे वय वर्षे २४ या विवाहित महिलेवर पंकज भगवान जाधव व धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे या दोघांनी सामूहिक बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे प्रेत नग्नावस्थेत फेकून दिले.

या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध सामुहिक बलात्कार करून खून केल्याच्या आरोपखाली गु.र.नं. ४५३/२०२० भा.दं.वि. ३०२, ३७६ (ड) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पंकज जाधव व धनंजय उर्फ अजय इंगळे आरोपीना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना ५ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. दरम्यान ५ नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता दोन्ही आरोपीना न्यायाल्याने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे पुढील तपास करीत आहेत.




No comments