Breaking News

दिल्लीतील शेतकरी कामगार आंदोलनाला पाठिंबा म्हणून फडातच ऊसतोड कामगारांचे आंदोलन


ऊसतोड कामगारांसाठी कायदा करून महामंडळ कार्यान्वित करण्याची मोहन जाधव यांनी केली मागणी

बीड :  केंद्र सरकारने शेतकरी विरोधी व कामगार विरोधी कायदे केलेले आहेत, यामुळे सर्व कामगार, शेतकरी संघटनांनी मिळून 26, 27 नोव्हेंबर पासून देशव्यापी संप, आंदोलन पुकारले होते हे आंदोलन शासन दडपण्याचा प्रयत्न करत आहे.

 

यामुळे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून ऊसतोड कामगार संघटना सीटू चे मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आज इर्ला येथे फडातच आंदोलन करून पाठिंबा दिला. ऊसतोड कामगारांसाठी कायदा करावा व स्व गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळ सुरू करण्यात यावे यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी ऊसतोड कामगारांचे नेते मोहन जाधव, अशोक राठोड सह कामगार उपस्थित होते.
No comments