Breaking News

आ. विनायक मेटे साहेब शेतकऱ्यांच्या मदतीला सातत्याने धावून येतात - लक्ष्मण दादा ढवळे


लिंबा(रुई) येथे शिवसंग्राम नेते नारायण काशीद यांच्या उपस्थितीत मोफत बियाण्याचे वाटप

बीड :   शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांच्या उपस्थितीत गरजू व आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील तसेच भाजीपाला पिकांचे बी - बियाण्यांचे मोफत वाटप उमरद (जहांगीर) येथे करण्यात आले होते, उर्वरित गावांमध्ये टप्प्याटप्प्याने वाटप सुरु करण्यात आले आहे.  हे वाटप शिवसंग्राम किसान आघाडी, सावा सीड्सच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. दि २० नोव्हेंबर २०२० रोजी बीड तालुक्यातील लिंबा(रुई) येथे शिवसंग्राम जेष्ठ नेते लक्ष्मण दादा ढवळे व माजी सभापती नारायण काशीद यांच्या उपस्थितीत बी बियाण्याचे गरजू शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले.

   शिवसंग्राम किसान आघाडी व सावा सिड्सच्या संयुक्त विद्यमाने शेकडो शेतकऱ्यांना गहू, हरभरा, भेंडी, वाल, चाऱ्याची बाजरी आदींचे बी बियाणे मोफत वाटप करण्यात येत आहे. आ विनायक मेटे यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली चळवळ हि अत्यंत गरजेची असून अडचणीच्या काळात मेटे साहेब शेतकऱ्यांसाठी धावून येत आहेत, कोरोना, अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांना एकीकडे सरकार मदत करत नाही मात्र काही अंशी का होईना शिवसंग्राम मदतीला पडत असल्याचे जेष्ठ नेते लक्ष्मण दादा ढवळे लिंबा येथील संत सावता माळी यांच्या मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या बी बियाणे वाटप कार्यक्रमात म्हणाले. यावेळी नारायण काशीद यांनी शिवसंग्राम यापुढेही शेतकऱ्यांना लागले तेवढी मदत मेटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करत राहील असे म्हंटले. यावेळी शिवसंग्राम नेते नानासाहेब कडबाणे, शब्बीर भाई व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.


No comments