Breaking News

ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली व चालकासह विहिरीत कोसळले

  


चालक बीड जिल्ह्यातील उमरीचा रहिवाशी; मृतदेह सापडण्याचे काम रात्रीही युद्धपातळीवर सुरु

आ. विनायक मेटे तपास यंत्रणेच्या दिवसभर संपर्कात

मुंबई/बीड/कराड : बीड तालुक्यातील उमरद खालसा येथील ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर कराड जि सातारा येथील वडोळी या गावातील विहिरीत काल सकाळी ट्रॉली व चालकासह कोसळला. या विहिरीतून स्थानिक प्रशासनाने काल रात्रीपर्यंत ट्रॉली, ट्रॅक्टर व ऊस बाहेर काढला मात्र चालकाचा मृतदेह अद्याप आढळून आलेला नाही. तेथील ऊसतोड कामगारांच्या सांगण्यावरून सदर ट्रॅक्टरचा चालक हा बीड तालुक्यातील उमरद खालसा येथील हनुमान पांडुरंग झोबाडे हे होते.

     

शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क करून तपास व मदत कार्यात गती आणली. शिवाय सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी त्यांनी तात्काळ संपर्क केल्याने मदत कार्यास आवश्यक साधने उपलब्ध झालेली आहेत. रात्रीपर्यंत मृतदेह आढळून आलेला नसून ३५ फूट पाणी उपसणे बाकी असल्याचे कराड तालुका पोलिसांकडून माहिती मिळत आहेत. शिवसंग्रामप्रणित महाराष्ट्र ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बबनराव माने हे या तपासकार्यावर लक्ष ठेऊन आहेत. सदर ऊस वाहतूक ट्रॅक्टर हे यशवंत शुगर या कारखान्यावर काम करत होते.No comments