Breaking News

साळेगाव खून प्रकरण : त्या नराधमांना ५ नोव्हेबर पर्यंत पोलीस कोठडीगौतम बचुटे । केज  

शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या २४ वर्षीय महिलेवर दोघांनी आळीपाळीने बलात्कार करून त्याची वाच्यता होईल. पोलीस कार्यवाही करतील म्हणून त्या दोघांनी संगनमत करून तिचा गळा आवळून निर्घृणपणे खून केला. या धक्कादायक घटनेतील दोन्ही नराधमांना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच या खुनाच्या संदर्भात अनेकांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात येत आहे.

केज तालुक्यातील साळेगाव येथे दि.३० ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वा दरम्यान शेतात कापूस वेचणीचे काम करीत असलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेवर गावातीलच पंकज जाधव याने बळजबरीने बलात्कार केला. त्या नंतर त्याने त्याचा मित्र धनंजय इंगळे यास बोलावून घेतले. धनंजय इंगळे यानेही तिच्यावर बलात्कार केला. त्याची गावात वाच्यता होईल आणि पोलीस कार्यवाही करतील; या भितीपोटी त्या दोघांनी संगनमत करून तिचा खून केला. खून केल्या नंतर पुन्हा ती मेली तरी तिच्या डोक्यात दगड घातला. नंतर नग्नावस्थेत तिचे प्रेत बाजूला टाकून पोबारा केला होता. परंतु पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने मयत व त्या परिसरातील कॉल डिटेल्सच्या आधारे पंकज आणि धनंजय उर्फ अजय इंगळे यास ताब्यात घेतले. त्यांच्यावर बलात्कार करून खून करून पुरावे नष्ट करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. अधिक तपसासाठी न्यायालयाने आरोपीना दि. ५ नोव्हेंबर पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच बरोबर गुन्हेगारांच्या संपर्कातील अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन आणि त्याचे सहकारी करीत आहेत.

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी  एवढी गंभीर व खळबळजनक घटना असताना केज पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अवघ्या काही तासातच पोलीसांनी आरोपी ताब्यात घेतल्यामुळे पोलीसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आईविना पोरकी मुले  

भैरव  व सोहम ही मयत महिलेची मुले असून भैरव आठ वर्षाचा तर सोहम अवघ्या तीन वर्षांचा आहे. या घटनेमुळे तिची दोन्ही मुले आईविना पोरकी झाली आहेत.


No comments