Breaking News

शिवसंग्रामकडून नगरपरिषदेला टाळे ठोकण्याची तयारी सुरु होताच जाणीवपूर्वक अडवलेल्या रस्त्यांची कामे झाली सुरु


बीडकरांकडून शिवसंग्राम व उपोषणकर्ते दत्ता गायकवाड यांचे मानले जात आहे आभार

बीड :  नगरपरिषद, बीडच्या हलगर्जीपणामुळे बीडकरांचे प्रचंड हाल होत आहेत, शहरातील पिंपरगव्हाण रोड, हिरालाल चौक, मोंढा रोड, शाहूनगर या भागातील रस्त्यांच्या कामांना बोगसगिरीचे नाव देऊन जाणीवपूर्वक थांबवले गेले होते. या रस्त्यांची कामे सुरु करण्यात यावीत यासाठी शिवसंग्रामचे माजी नगरसेवक दत्ता गायकवाड हे हिरालाल चौक येथे ४ दिवस उपोषणाला बसले होते.

         

या उपोषणाच्या धसक्याने नगरपरिषदेकडून तात्काळ तात्पुरते रस्त्याचे काम सुरु करण्यात आले होते तर रस्त्याच्या कामाला मंगळवारपासून सुरुवात करा अन्यथा नगरपरिषदेला टाळे ठोकले जाईल असा इसारा शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक  मेटे यांनी दिला होता. शिवसंग्रामच्या धसक्याने काल या ठिकाणी कामास सुरुवात झालेली आहे. या ठिकाणच्या काम सुरु करण्यात आल्यामुळे बीडकरांच्या वतीने याबद्दल शिवसंग्रामचे आभार मानत आहेत.

 दत्ता गायकवाड यांच्या आंदोलनाला हे यश मिळालेले आहे. या ठिकाणी शिवसंग्रामचे बीड शहर प्रभारी तथा सरचिटणीस अनिल घुमरे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, माजी सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, गणेश धोंडरे, लाला शेख, मुस्तफा, सामाजिक न्याय सरचिटणीस प्रेम धायजे, स्वप्नील हातागळे, रघुवीर कुरे, सागर धनवे, रवींद्र हातागळे आदींसह शिवसंग्राम पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाहणी केली.


चक्क ... रस्तेकाम जाणीवपूर्वक अडवून बीडकरांना त्रास देणाऱ्यांचे फोटोसेशन    

काल सकाळी ज्या क्षीरसागरांनी रस्त्याचे काम अडवले आहे व ज्यातून संपूर्ण बीड शहरातील नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागले आहेत चक्क तेच काल सकाळी त्या ठिकाणी काम सुरु झाल्यानंतर फोटोसेशन करत होते. क्षीरसागरांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी अशी प्रतिक्रिया बीडकरांमधून व्यक्त केली जात आहे. आता बीडमधील नागरिकांनी दर्जेदार रस्त्याकाम करून घेण्यासाठी पुढे यायला हवे असे आवाहन देखील शिवसंग्राम कडून करण्यात आले आहे.  


No comments