Breaking News

धर्मगुरू संत डॉ.रामराव बापूंच्या निधनाने बंजारा समाज झाला पोरका -अ‍ॅड.संगिता चव्हाण

 बीड :  महान तपस्वी,धर्मगुरू संत रामराव बापू महाराज यांचे निधन झाल्याचे माहित होताच जीवाला एकदम धक्काच बसला. बापूचे जाण्याने बंजारा समाजाचे कधीही भरून न निघणारी प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. देवअवतारी महात्मा या जगातून निघून गेल्याने समाज पोरका झाला असून एक महान तपस्वीला समस्त भक्तगण मुकल्याचे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड.संगिता चव्हाण यांनी म्हटले आहे. 


जगामध्ये बंजारा  समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पोहरादेवी येथील संत श्री सेवालाल महाराज यांच्या वंशज मधील अखंड ब्रह्मचारी डॉ. रामरावजी महाराज बापूंच्या निधनाने एका प्रदिर्घ कालखंडाला पूर्ण विराम मिळाला असून,बंजारा समाजाची कधीही भरून न निघणारी प्रचंड मोठी हाणी झाली आहे. महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या निधनाने बंजारा समाज जेवढा दु:खी व पोरका झाला होता तेवढाच दु:खी व पोरका आज बंजारा समाज बापूंच्या जाण्याने दुःखी झाला आहे. असे अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी म्हटले असून शिवसेना महिला आघाडी बीडच्या वतीनेबापूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पन करण्यात आली.No comments