Breaking News

भाजपाकडुन आष्टी, पाटोदा, शिरुर नगरपंचायत निवडणुक लढवु ईच्छिणा-यांनी तिन्ही तालुकाध्यक्ष यांच्याकडे बुधवारपर्यत अर्ज सादर करावेत- माजी आ.भीमराव धोंडे

 


के. के. निकाळजे । आष्टी 

भाजपाच्यावतीने ज्या ईच्छुकांना आष्टी,पाटोदा ,शिरुर नगरपंचायतीची निवडणुक लढवायची आहे अशा  ईच्छुकांनी भाजपाचे तिन्ही तालुकाध्यक्षांकडे आपले अर्ज बुधवार दि.२५ नोव्हेंबर २०२० पर्यत सादर करावेत असे आवाहन भाजपनेते माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे.

          

आष्टी, पाटोदा, शिरुर या तिन्ही नगरपंचायतीच्या निवडणूकीचा बिगुल वाजला आहे.माजी आ.भीमराव धोंडे  यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पॕनल होणार आहेत तरी या निवडणूकीत ज्यांना भाजपतर्फे निवडणुक लढायची आहे. त्यांनी संबधीत भाजपचे तालुकाध्यक्ष डाॕ.मधुसुदन खेडकर (शिरुर),ॲड.सुधीर घुमरे (पाटोदा ), ॲड.हनुमंत थोरवे (आष्टी) यांच्याकडे आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे.आष्टी ,पाटोदा ,शिरुर या तिन्ही शहरातील नागरिकांशी आणि ईच्छुकांशी माजी आ.धोंडे हे लवकरच संवाद साधणार असल्याचे आष्टीचे तालुकाध्यक्ष ॲड.थोरवे म्हणाले.


No comments