Breaking News

82 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात; हाॕस्पीटल स्टाफने दिर्घायुष्याच्या दिल्या शुभेच्छा


के. के. निकाळजे । आष्टी 

शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या ध्रुव कोव्हीड हाॕस्पीटलच्या माध्यमातून अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणावर उपचार मिळण्यास मदत होत आहे.विशेष म्हणजे गेली 18  दिवस उपचार घेत असलेले 82 वर्षीय कोरोनाग्रस्त आजोबा या हाॕस्पीटलमधील योग्य उपचाराने कोरोनावर मात करुन आपल्या घरी परतले आहेत.

सद्यस्थितीत राज्यातील कोरोनाग्रस्तांची रुग्णांची संख्या दिवसेंदिवस जितकी वाढते आहे त्याच प्रमाणात रुग्ण बरे होण्याचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे.त्यातच आष्टी शहरातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या गेल्या तीन ते चार महिण्यात वेगाने वाढत होती.त्यातच या रुग्णांना उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात जावे लागत होते.त्यामुळे रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फरफट होत असल्याचे चिञ होते.माञ गेल्या महिण्यात आष्टी शहरात अत्यंत माफक दरात रुग्णसेवेकरीता डाॕ.सुदाम जरे यांनी ध्रुव कोव्हीड हाॕस्पीटलची उभारणी केली.त्यामुळे साहजिकच कोरोनाग्रस्त रुग्णांना या हाॕस्पीटलमध्ये उपचार घेण्याबरोबरच मानसिक समाधान मिळत असल्याने रुग्णांना 24 तास मिळणारी सुविधा तसेच सदर ठिकाणी सेवा देत असलेले डाॕ.सचिन धस व डाॕ.नितीन राठोड यांच्यासह तिथे असलेला स्टाफ हा रुग्णांचे मनोबल वाढवित असल्याचे दिसत आहे.याचाच एक भाग म्हणून गेली 18 दिवस 82 वर्षीय कोरोनाग्रस्त असलेले आजोबा शुक्रवारी कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.यावेळी हाॕस्पीटलच्या सर्व स्टाफने या आजोबांना दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.


No comments