Breaking News

खुनी हल्ला प्रकरणी 307 कलमानुसार गुन्हा दाखल करा

सरपंच पतीची उप विभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

गौतम बचुटे । केज   

तालुक्यातील जानेगाव येथील महिला सरपंचाचे पती यांच्यावर तिघांनी संगनमताने जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले होते. तरी देखील हल्लेखोरांवर खुनाचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. म्हणून सरपंच पती विलास ओव्हाळ यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी केज यांना सदर प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमाखाली कार्यवाही करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.

या बाबतची माहिती असा की, केज तालुक्यातील जानेगाव येथील महिला सरपंच आम्रपाली ओव्हाळ यांची पती विलास ओव्हाळ यांच्यावर महादेव ऊर्फ बाळू शिंदे  अशोक उर्फ भैया शिंदे आणि  अशोक शिंदे या तिघांनी संगणमत करून दिनांक २ ऑक्टोबर रोजी अडवून मारहाण केली. तसेच छातीवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले होते. 

या प्रकरणी त्यांच्या जवाबा वरून दिनांक १३ ऑक्टोबर रोजी युसुफ वडगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २००/२०२० भा.दं.वि. ३२४, ५०४, ५०६, ३४ आणि  अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) (आर) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु तिघांनी कट करून घातक शस्त्राने छातीवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी गंभीर जखमी केले. अशी घटना असताना देखील पोलिसांनी भा.दं.वि. ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला नाही. यामुळे विलास ओहाळ यांनी दिनांक ७ नोव्हेंबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी केज यांना एका लेखी पत्राद्वारे अशोक उर्फ भैय्या शिंदे अशोक फुलचंद शिंदे आणि महादेव ऊर्फ बाळू शिंदे या तिघांवर भा.दं.वि. ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. No comments